। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करुन केंद्रीय कर्मचार्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे सरकारी तिजोरीवर 9,488.70 कोटी रुपयांचा भार येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. जवळपास 47.14 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.
कोविडमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याने 2020 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि डीआरची वाढ रोखून धरली होती. जुलैमध्ये झालेल्या डीए, डीआर वाढीचा लाखो कर्मचार्यांना फायदा झाला होता. एक जुलै 2021 पासून ही वाढ लागू झाली होती. 17 वरुन 28 टक्के महागाई भत्ता झाला होता. यामुळे तिजोरीवर 34,400 कोटीचा भार पडला होता. ताज्या मंजुरीनंतर महागाई भत्ता आता 31 टक्के झाला आहे.