। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील तळोजा येथील भंगार गोदामाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. याठिकाणी असलेल्या बेकायदेशीर भंगार गोदामात प्लास्टिकसह लाकडी आणि इतर सामान मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानकपणे आग लागून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेले भंगार साहित्य भस्मसात झाले आहे. आगीची माहिती मिळताच तळोजा, नवी मुंबई, कळंबोली, पनवेल अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. पाच तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे बेकायदेशीररित्या भंगारमाफियांवर संबधित खात्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.