| रसायनी | प्रतिनिधी |
तुराडेवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत विनोद विजय वाघे (28) जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन विलास वाघे, आर्यन बाळू वाघे आणि साहिल राजा वाघमारे यांच्यासोबत विनोद वाघे यांचा वाद झाला. यावेळी साहिल वाघमारे याने लोखंडी सळईने विनोद यांच्या गुडघ्यावर मारले, तर रोशन व आर्यन यांनी डोळ्यावर व डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेल्या विनोद यांच्या पत्नीलादेखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत.





