किनार्‍या लगतच्या घरात समुद्राचे पाणी

| बोर्लीपंचतन । प्रतिनीधी ।
गेले काही दिवस सातत्याने पडणार्‍या पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यात ठीक ठिकाणी पाणीच पाणी साचलेले दिसून येत होते. भरडखोल येथील समुद्र किनार्‍यालगत वसलेल्या जवळजवळ 17 कुटुंबांच्या घरांमधून खवळलेल्या समुद्राचे पाणी शिरले आहे. अशी परिस्थिती गेले काही वर्ष चालू आहे. पावसाळा सुरू झाला की समुद्राचे पाणी खवळले जाते आणि ते पाणी समुद्रकिनार्‍या लगत वसलेल्या घरांमधून शिरते. याकडे तालुक्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जनतेमध्ये मात्र नाराजी व्यक्तकरण्यात येत आहे़.

भरडखोल येथील आनंद पावशे, सुगंध खोपटकर, भीम खोपटकर, जाया चोगले, गहिनीनाथ चौगुले, विठ्ठल भो़ईंकर, पद्मा चौगुले, रोहिदास चौगुले, महादेव चौगुले, कृष्णा चौगुले, आनंद चौगुले, पांडुरंग पावशे, नामदेव पावशे, महादेव भोईर, अशा एकूण जवळजवळ 17 कुटुंबांच्या घरामध्ये खवळलेल्या समुद्राचे पाणी शिरत आहे. यामुळे येथील कुटुंबीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भरडखोल येथील सरपंच दिनेश चौगुले हे प्रशासनाकडे संरक्षण भिंत व रिटर्निंग वॉलची मागणी करणार आहेत. तरी शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे. अशी विनंती तेथील ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version