पनवेल | वार्ताहर |
आयईईई द्वारा प्रस्तुत एआयसीटीई प्रायोजित कॉन्फरन्स ऑन टेक्नॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज -3 नवीन पनवेल येथील पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कॉन्फरन्स ऑन टेकनॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज 2021 या श्रृंखलेतील दुसरी परिषद नुकतीच यशस्वीरित्या संप्पन झाली.
परिषद आयईईई व एआयसीटीई यांनी प्रायोजित केली. या परिषदेमध्ये आपले संशोधन मांडण्यासाठी एकंदर 6 गट उपलब्ध होते सॉफ्टवेअर हार्डवेअर ( पदार्थ विज्ञान ) मटेरिअल्स , सिस्टिम्स , प्लॅनिंग आणि हेल्थकेअर यामध्ये सर्व मिळून 120 जणांनी आपले संशोधन भाषणाद्वारे किंवा भित्तीपत्रकाद्वारे मांडले . या व्यतिरिक्त 150 जणांनी परिषदेला हजेरी लावली .यावेळी डॉ . आर के शेवगांवकर , डॉ.संजय ओक,पिल्लईचे मुख्य अधिकारी डॉ . प्रियम पिल्लई,डॉ.पद्मजा जोशी,डॉ . विरले बंदगिनस्ते ,उदयभास्कर डॉ . विजय कुलकर्णी , डॉ . सत्यनारायण डॉ . रामास्वामी,अनुपमा करानम,उपेंद्र भाटे यांनी सहभाग घेतला.