शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

| मुंबई | वृत्तसंस्था |

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी एकूण 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाकडून 17 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अनंत गिते, अनिल देसाई, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर या नावांचा समावेश होता.

बुलढाणा- नरेंद्र खेडेकर, यवतमाळ – वाशिम – संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे-पाटील, सांगली – चंद्रहार पाटील, हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, धाराशिव – ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे, नाशिक – राजाभाई वाजे, रायगड – अनंत गीते, सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत, ठाणे – राजन विचारे, मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील, मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत, मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर, परभणी – संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई, कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर, हातकणंगले – सत्यजीत पाटील, पालघर – भारती कामडी, जळगाव – करण पवार.

Exit mobile version