भारतीय महिलांचा दुसरा विजय

राधा, दीप्तीची धारदार गोलंदाजी

। ढाका । वृृत्तसंस्था ।

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौर्‍यावर आहे. या दौर्‍यात भारतीय महिला आणि बांगलादेश महिला संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारतीय महिला संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 19 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

दुसर्‍या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 120 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारताने 5.2 षटकात 1 बाद 47 धावा केलेल्या असताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने हा सामना थांबला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाचा वापर करत भारताला 19 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. यावेळी भारताकडून गोलंदाजीत राधा यादवने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले, तर दिप्ती शर्माने 4 षटकात 14 धावांत 2 बळी घेतले. याशिवाय श्रेयंका पाटीलनेही 4 षटकात 24 धावांत 2 बळी घेतले. तर, पुजा वस्त्राकरनेही 1 बळी घेतला.

आता या दोन संघात तिसरा सामना 2 मे रोजी होणार आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी भारतीय संघाला आहे.

Exit mobile version