उरण किनारी सागरी सुरक्षा मोहीम

। उरण । वार्ताहर ।
भारतीय नौदलाकडून जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्‍याजवळील गावांमध्ये सुरक्षा जागरूकता आणि डेटा संकलन मोहिम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग व पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव यांच्या सूचनेनुसार व पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली किनारी भागात दि. 4 ऑगस्ट रोजी पथक आले होते. या अभियानामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर डेविड सिंह, कोस्टगार्ड प्रधान अधिकारी पी.एम.सतदेव, ओएनजीसीचे सुरक्षा निरीक्षक अधिकारी स्वनिल ठाकुर, सुनिल कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, सपोनि विशाल राजवाडे, नौका विभागाचे साईनाथ दळवी, बंदर विभागाचे पोलीस निरीक्षक देवीदास जाधव, करंजा मासेमारी सोसायटी अध्यक्ष भालचंद्र कोळी व सागरी किनारी गावातील 110 सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव व मासेमारी सोसायटीचे अध्यक्ष तसेच विविध कार्यकारी मच्छिमार सहकार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते.

Exit mobile version