माथेरानमध्ये सुरक्षितेचा प्रश्‍न ऐरणीवर

घोडयावरून पडुन मृत्यू प्रमाण वाढले

| कर्जत । वार्ताहर ।

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरान मध्ये घोडयावरून पडुन पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वर्षाला एक सरासरी झाले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या बाबत उपाययोजना घेणे महत्वाचे आहे अशी चर्चा सुरू आहे.

25 जानेवारी रोजी आपल्या पत्नीसह माथेरानला फिरायला आलेल्या मोहम्मद काशीद इम्तियाज शेख वय-23 या तरुणाचा घोड्यावरून पडून अपघात झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहीती समोर आली आहे. याआधी 2015 साली इंडिया मेहयू ही परदेशी पर्यटक घोड्याच्या पायाखालील येऊन मृतृमुखी पडली तर 2016 साली निलीम सिंग हीचा एको पॉईट दरम्यान घोड्यावरून पङून मृत्यू झाला होता. 2018 मध्ये गॅटरोड येथील रहिवाशी रशिदा रेडीओवाला हिला गंभीर दुखापत झाली होती. 2018 साली भिवंडी येथिल रहिवाशी अश्रफ खान देखील दुस्तरी नाक्यावर पडून मोठी दुखापत झाली होती. 1997 साली एका विदेशी पर्यटकाचा घोडा उधळल्याने लुईझा पॉईटवरून दरीत पडून घोड्यासह मृत्यू झाला होता.

माणसांचे जिवन हे अमूल्य असून त्या बाबत सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून काळजी घेणे महत्वाचे आहे. सुमारे दोन वर्षापुर्वी समिर बांदेकर यांनी घोडे स्वारी सुरक्षीते करता मोफत हेल्मेट वाटप केले होते. मात्र काही दिवसातच हेल्मेट वापरणे बंद झाले, एवढे मृत्यू होऊन देखील पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटनकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे कुठेच पाऊल उचलण्याचे दिसून येत नाही. माथेरानला येणार्‍या पर्यटकांचे घोडा हे प्रमुख आकर्षण आहे, इथे येणारा पर्यटक घोड्यावरून फिरायला जात नाही अस होत नाही त्यामुळे पर्यटकांनची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे.

हेल्मेट सक्तीचे करणे
नगरपालिकेने महालक्ष्मी रेसकोर्सच्या धर्तीवर चांगले रायडिंग ट्रेक तयार करणे गरजेचे आहे, तर घोड्यावर बसणार्‍या पर्यटकांना हेल्मेट सक्तीचे करणे तसेच घोड्यावर काम करणारा कामगार प्रक्षिक्षित आहे कींवा नाही हे पोलीसांनी तपासणे गरजेचे आहे, अन्यथा असे बळी जातच राहतील.

Exit mobile version