डोवाल यांच्याकडून सुरक्षेचा आढावा

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांशी राज्यातील कायदा, सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. गेल्या महिन्यात रायगडात हरीहरेश्‍वर येथे सापडलेल्या संशयास्पद बोटीच्या पार्श्‍वभूमीवर ही सुऱक्षा भेट होती, असे सुत्रांनी स्पष्ट केले.

डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घातपात करण्याच्या आलेल्या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर डोवाल यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version