कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये बीजारोपण

निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांचा स्तुत्य उपक्रम
। उरण । वार्ताहर ।
सिडको आधिकारी तसेच निसर्ग, गडप्रेमी हितेंद्र घरत हे वेगवेगळ्या डोंगरांवर सलग 25 वर्षे बीजारोपण करीत आहेत. यावर्षी नवपरिवर्तन संस्थेच्या सहकार्याने कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये दोन लाख बीजारोपण करण्याचा संकल्प करीत तो पूर्ण करण्यात आला. यावेळी हितेंद्र घरत यांचा परिवार, मित्रमंडळी तसेच अनेक हितचिंतक या उपक्रमात सहभागी झाले होते.

आपल्या देशात व राज्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निसर्ग लोप पावत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोलही ढासळत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहे. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उरणमधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत हे गेली 25 वर्षे फळांच्या हजारो बिया गोळा करून त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात टाकीत आहेत.

दरम्यान, कोमनादेवी येथील ऑक्सिजन पार्क येथे बीजरोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांनी दोन लाख आंबा, फणस, जांभुळ, काजू अशा फळ बियांचे मान्यवरांच्या हस्ते रोपण केले. यावेळी त्यांचा एक सहकारी मित्र कोरोनाकाळात ऑक्सिजन अभावी मृत्यू पावला होता. त्याच्या स्मरणार्थ कापूर या झाडांचीही लागवड करण्यात आली.

या उपक्रमात निसर्गप्रेमी हितेंद्र घरत, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. सत्या ठाकरे, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संघाचे घनःश्याम कडू, नवपरिवर्तन संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार विरेश मोडखरकर तसेच सर्व सदस्य तसेच सुभाष पाटील, रतन दळवी, रामचंद्र राऊत, सदानंद थळी, फिटवेल जिमचे सर्व व्यायामपटू व अनेक महिला, निसर्गप्रेमी गडप्रेमी गणेश भोईर, सारडे विकास मंचचे कार्याध्यक्ष रोहित पाटील, हरिष म्हात्रे, जितेंद्र थळी, त्रिजन पाटील, संदेश पाटील, मिलिंद म्हात्रे, हरिश्‍चंद्र म्हात्रे, रुपाली म्हात्रे, स्नेहीत, दानिश, श्रीवेद आदींचे मोलाचं सहकार्य लाभले.

Exit mobile version