कोटेश्वरी मंदिरात सीमोल्लंघन सोहळा

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

मुरूड शहराची ऐतिहासिककालीन ग्रामदेवता श्री कोटेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव धार्मिक आणि उत्साहात संपन्न होत असून भजन, नवचंडी होम आदी विविध धार्मिक विधी गेल्या 10 दिवसात संपन्न झाल्याची माहिती कोटेश्वरी देवस्थान चे अध्यक्ष श्री नयन कर्णिक, पदाधिकारी नारायण पटेल, अरुण बागडे, उषा खोत, स्वाती माळी यांनी मंदिरात बोलताना केले.

दसरा दिनी कोटेश्वरी मंदिरात सीमोल्लंघन कार्यक्रम सायंकाळी मंदिर प्रांगणात दर वर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आल्याचे नयन कर्णिक यांनी सांगितले. ही परंपरा 200 वर्षांपासून सुरू असल्याचे कर्णिक यानी स्पष्ट केले. आधुनिक काळात हल्लीच्या मुलांना या सीमोल्लंघनाचे महत्व फारसे माहीत नाही. परंतु यामागे खूप प्राचीन घटना कारणीभूत असल्याचे इतिहासावरून कळून येते. मुरूडच्या ऐतिहासिक कालीन कोटेश्वरी देवस्थान प्रांगणात दसरा दिनी सायंकाळी 6 वाजता पारंपारिक सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन कोटेश्वरी ट्रस्ट तर्फे करण्यांत आले आहे. यासाठी समस्त भक्तजनांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोटेश्वरी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

गेल्या दहा दिवसांत अनेक भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन आराधना केली. मुरूड शहराच्या वेशिवरच देवीचे प्रशस्त मंदीर असून जीर्णोद्धार देखील या पूर्वीच झालेला आहे. आताचे मंदिर प्रशस्त आणि सुनियोजित आहे. कोटेश्वरी देवीचे भक्तजन महाराष्ट्रात विखुरलेले आहेत. नवरात्रोत्सवात भक्त खास करून दर्शनासाठी येत असतात, असे दिसून येते. देवीच्या सानिध्यात भक्तांना निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. मोबाइल युग आहे. तरीही पुढेही आपल्या परंपरा, संस्कृती नव्यापिढीने माहिती घेऊन अंगिकारल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत. प्रत्येक धार्मिक परंपरेच्या मागे महान इतिहास आहे. ही भारतीय संस्कृतीची श्रीमंती आहे.

Exit mobile version