चहलला डच्चू दिल्याने सेहवाग नाराज

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहिर झाला. मात्र, काही महत्त्वाच्या खेळाडूंना अनपेक्षितपणे डच्चू देण्यात आला आहे. या यादीत युजवेंद्र चहल याचेदेखील नाव आहे. निवड समितीच्या या निर्णयावर आश्‍चर्य व्यक्त करत अनेकांनी टीकादेखील केली होती. दरम्यान, माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग चहलच्या निवडीसाठी पुढे सरसावला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या 18 सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्‍विनसह एकूण पाच फिरकी गोलंदांजांना संधी देण्यात आली आहे. तर संघात चहलऐवजी फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चहर प्राधान्य देण्यात आले आहे. निवड समितीच्या या निर्णयावर सेहवागने आपले मत मांडले. मचहल हा भारताच्या टी-20 संघातला महत्त्वाचा घटक आहे. मोक्याच्या क्षणी बळी घेण्यात तो तरबेज आहे. त्यामुळे त्याला भारताच्या टी-20 संघात स्थान मिळायला हवे होते. त्याला संघात न घेण्याबाबत निवड समितीने स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण चहल हा असा गोलंदाज आहे की त्याला बळी कसे घ्यायचे, याची जाण आहे. तसेच भारतासाठी त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असल्याचे सेहवागने म्हटले आहे.

Exit mobile version