सेहवागची ‘मन की बात’

MUMBAI, INDIA - NOVEMBER 14: Virender Sehwag speaks during the ICC Hall of Fame Celebration on November 14, 2023 in Mumbai, India. (Photo by Darrian Traynor-ICC/ICC via Getty Images)

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक जिंकल्यानंतर रोहित आणि विराट यांनी टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. यासोबतच अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने देखील टी-20 निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान, सेहवागला झिम्बाब्वेला गेलेल्या युवा खेळाडूंबद्दल विचारले असता तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय निवड देशांतर्गत होते. झिम्बाब्वे दौर्‍यात कामगिरी करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यास पात्र आहे की नाही हे पाहण्याजोगे आहे. 2010 मध्ये असे होते की, जी नवीन संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळायला जात होती ती जिंकून येत असायची.

सेहवाग पुढे म्हणाला की, चांगले प्रदर्शन करणार्‍या खेळाडूंना पुढच्या ओळीत टाकले जाते. पुढील टी-20 विश्‍वचषकासाठी निवडकर्ते हे लक्षात ठेवतात की कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी छाप सोडली. झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसारख्या दौर्‍यांवर कामगिरी करुन निवृत्त झालेले खेळाडूंना टी-20 संघात घेऊ शकतात. ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे मधल्या फळीत असू शकतात. निवडकर्ते तपासतील की अव्वल 3 मध्ये कोण येऊ शकतं. रोहित आणि कोहली बाहेर पडल्यानंतर त्यांची जागा कोण घेईल, कदाचित हाच विचार करुन झिम्बाब्वे दौर्‍यासाठी या भारतीय संघाची निवड झाली असेल.

Exit mobile version