ई-सिगारेट जप्त

| पनवेल |प्रतिनिधि |

गुन्हे शाखेने खारघर सेक्टर 4 मध्ये छापा टाकून सहा लाख 44 हजार रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी अर्जुन राठोड (वय 27) नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. येथील श्री महावीर एक्स्प्रेस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, श्री लक्ष्मण व्हिला इमारतीच्या गाळ्यामध्ये ई-सिगारेटचा साठा ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार संतोष गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर गाळ्यामध्ये छापा टाकला. शहरात या प्रकारे गुन्हे उघडकीस येत असल्याने याबाबत पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त वाढवली असून अधिक तपास सुरू केला आहे.

Exit mobile version