। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.राजीव साबळे यांची कन्या सेजल ही लंडन येथील मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीमध्ये आरोग्य मानसशास्त्र (हेल्थ सायकोलॉजी) विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल सेजलचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.
मानसशास्त्र हा विषय अत्यंत कठीण आणि अवघड समजला जातो. हा विषय लाखो विद्यार्थ्यांपैकी मोजकेच विद्यार्थी निवडतात. मात्र, त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उत्तीर्ण होतात. सेजल साबळे हीने उच्च शिक्षण (एम.ए.सायकोलॉजी) पूणे येथून अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यानंतर सेजलने लंडन येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. याबद्दल सेजलचे मनापासून हार्दिक अभिनंदन करुन तिला माणगावकरानी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.