जसखार उपसरपंचपदी प्रणाली म्हात्रे
| उरण | वार्ताहर |
जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गाव विकास आघाडीच्या प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सरपंच काशिबाई ठाकूर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच गाव विकास आघाडीचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
विकास पाटील पाटणोलीचे उपसरपंच
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील पाटणोली उपसरपंचाच्या निवडणुकीत विकास पाटील यांना बिनविरोध निवडण्यात आले. सरपंचपदी अगोदरच नर्मदा वाघमारे या बिनविरोध निवडून आल्या होत्या. यावेळी सदस्य मानसी पाटील, हरतालिका पाटील, विक्रांत म्हात्रे, जनाबाई भोईर, चंद्रकांत वाघमारे, उपस्थित होते तर यावेळी माजी सरपंच किशोर पाटील, नरेश पाटील, सुधाकर पाटील, सारिका पाटील, दिपाली पाटील, मंगेश पाटील, संजय म्हात्रे यांच्यासह विलास म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, पोलीस पाटील भालचंद्र पाटील, विकी ठाकूर, स्वप्निल म्हात्रे, प्रविण म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, मदन पाटील, राजू पाटील, सचिन म्हात्रे यांच्यासह मोठया संख्येने पाटणोली ग्रामस्थ उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी योगदान देता येईल तो मी प्रामाणिकपणे देणार आहे. व गावामध्ये जास्तीत जास्त विकास निधी कशी आणता येईल यासाठी देखील मी प्रयत्न करणार असल्याचे उपसरपंच विकास पाटील यांनी सांगितले.
कोर्लई उपसरपंचपदी जितेंद्र पाटील
| रेवदंडा | प्रतिनिधी |
कोर्लई ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जितेंद्र पाटील यांची निवड झाली, तर कोर्लई ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदी निवडून गेलल्या सरपंच राजश्री प्रशांत मिसाळ यांनी सुध्दा पदभार स्विकारला. यावेळी सरपंच राजश्री मिसाळ यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक संपन्न झाली. शिंदे गटाचे उपेंद्र बलकवडे व ठाकरे गटाचे जितेंद्र पाटील यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते. दरम्यान उपसरपंचासाठी गुप्त मतदान घेण्यात आले, त्यामध्ये उध्दव ठाकरे गटाचे जितेंद्र पाटील विजयी ठरले.
काराव- गडब उपसरपंचपदी मनोज म्हात्रे
। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील काराव-गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदि मनोज म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यासी अधिकारी म्हणुन नवनिर्वाचित सरपंच मानसी पाटील यांनी काम पाहीले तर निरी क्षक म्हणुन पेण पंचायत समितिचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रसाद म्हात्रे यांनी काम पाहीले. यावेळी ग्रामसेविका आर. एस. धनावडे उपस्थित होत्या. या वेळी युवा नेते शेकापचे प्रसाद भोईर यांनी व ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य सरपंच व ग्रामस्थांनी उपसरपंच मनोज म्हात्रे यांचे अभिनंदन केले.
सुखदेव भोसले चावणीचे उपसरपंच
| खोपोली | प्रतिनिधी |
चावनी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुखदेव भोसले यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सदस्य लक्ष्मण घुटे, संगीता संदीप चिंचावडे, प्राची पांडुरंग पाटील, रमेश चव्हाण, सखुबाई वाघमारे, उषा रमेश वाघमारे हे सदस्य उपस्थित होते. यावेळी शेकापचे जेष्ठ नेते लक्ष्मण येरम, खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, धनगर समाजाचे नेते बबन शेडगे, माजी सरपंच मारुती फाटक, सामाजिक कार्यकर्ते बाळू बुधलेकर, संदिप चिंचावडे, गबलू भोसले, नवनाथ चिंचावडे सुभाष भोसले, बापू पाटील, परशुराम पाटील, सुभाष तिकोने, बाळू आखाडे, प्रकाश आखाडे, तुकाराम आखाडे, भगवान कोकरे, संतोष शेडगे आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कळंबुसरे उपसरपंच निवड
| उरण | वार्ताहर |
कलंबूसरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीच्या सारिका महेश पाटील या सात मतांनी निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसची सारिका पाटील आणि भाजपा युती तर्फे आश्विनी नाईक यांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये सारिका पाटील हिला सर्वाधीक सात मते मिळाली, तर आश्विनी नाईक हिला तीन मते मिळाली. त्यामुळे सारिका पाटील ही निवडून आल्याचे अध्यासी अधिकारी सरपंच ऊर्मिला नाईक यांनी जाहीर केले असून सारिका पाटील या उपसरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.
माणगाव मविआचे सुनिल खेडेकर विराजमान
| माणगाव | प्रतिनिधी |
हारकोल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिल खेडेकर हे विराजमान झाले. सरपंच फाईजा इस्तियाक हुर्जूक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सुनील नामदेव खेडेकर व रवींद्र गणपत काते या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 3 असे मतदान झाले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने सरपंच हुर्जूक यांनी आपले मत सुनील नामदेव खेडेकर यांना दिले. राजेश रमेश मोरे हे एकमेव सदस्य गैरहजर होते.