मुलींच्या रायगड क्रिकेट संघाची निवड

| उरण | वार्ताहर |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्षांखालील मुलींच्या संघाची निवड नुकतीच करण्यात आली. ही निवड चाचणी खारघर येथील इनामपुरी येथे पार पडली. या निवड चाचणीसाठी रायगड जिल्ह्यातून एकूण 28 मुली आल्या होत्या. त्यातून चार मुलींची निवड करुन महाराष्ट्र सिलेक्शन कॅम्पसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच रायगड मुलीचा संघ निवडण्यात आले आहे. ही निवड करताना रायगड जिल्ह्यात प्रथम असा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पालकांनी आणि खेळाडूंनी आभार मानले.

ही निवड मनीषा अडबळ आणि नीलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नीलम पाटील यांनी भारत अ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे, तर मनीषा पडबळ या महाराष्ट्राच्या चार वर्षे प्रशिक्षक राहिल्या आहेत. या निवड चाचणीत महाराष्ट्र रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, जिल्हा सरचिटणीस बहुतुले, स्पर्धा कमिटीचे चेअरमन किरीट पाटील, निवड समितीचे चेअरमन प्रीतम खैया, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, सुयोग चौधरी, संदीप पाटील, सुहास हिरवे, सागर सावंत आदी पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version