| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे 14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट निवड चाचणी 25 व 26 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण येथे ही निवड चाचणी होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे 14 वर्षांखालील मुलांची आमंत्रितांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्या स्पर्धेसाठी रायगडचा संघ या चाचणीतून निवडण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.
1 सप्टेंबर 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या रायगड जिल्ह्यातील मुलांनाच या निवड चाचणीत प्रवेश मिळेल. खेळाडूंनी 25 व 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता स्वतःच्या क्रिकेट किटसह पांढर्या गणवेशात भेंडखळ क्रिकेट अकॅडमी, उरण येथे उपस्थित राहावे. निवड चाचणीला येताना खेळाडूंनी सोबत आधार कार्डाची झेरॉक्स प्रत व मूळ प्रत, दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो व जन्म तारखेचा दाखला, आवश्यक सर्व कागदपत्र आणावे, असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव प्रशांत ओक यांनी केले आहे.