महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची निवड

। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवीन पदनियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन युवकांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेत जाहीर प्रवेश केला. कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांनी संघटनेबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष समीर कदम यांनी सगळ्या सदस्यांना पदाधिकार्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असा शब्द दिला. संघटनेत प्रवेश केलेले सगळे सदस्य व पदाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस व संघटनेसोबत सदैव राहण्याची आणि कायम संघटनेत राहून पोलिसांच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली. बैठकीस उपस्थित कोकण प्रमुख सैफ सुर्वे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष समीर कदम, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आतिफ गोठे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सखाराम गोरे, अमोल यादव, समीर आंब्रे, यश आंब्रे, विनय खरात, अमोल आंब्रे, विजय आंब्रे, संदेश साने, कादिर सुर्वे, जुनेद मणियार आदी उपस्थित होते.

Exit mobile version