। पाली/बेणसे । वार्ताहर ।
भुवनेश्वर येथे होणार्या राष्ट्रीय जलतरण वॉटर पोलो स्पर्धेकरीता जिल्ह्यातील सात खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. झोतिरपाडा, बेणसे, शिहू विभागातील खेळाडूंनी उरी जिद्द बाळगत कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण सरवातून राष्ट्रिय स्तरावर सक्षमपणे नेतृत्व करण्यास सज्ज होत या खेळाडूंनी सातत्याने चमकदार कामगिरी केली. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने 49 वी जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा 16 ते 20 जुलै रोजी भुवनेश्वर येथे होणार आहेत. स्पर्धेमध्ये प्रेषित तरे, सार्थक इंद्रे, सुजल भोय, प्रेम पाटील, रोहित कुथे,दिणांशु कुथे,आदर्श म्हात्रे यांची निवड राष्ट्रिय वॉटर पोलो स्पर्धेकरीता झाली आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे, गितेश कुथे, रोशन कुथे, प्रेमराज पिंगळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. रिलायन्स नागोठणे विभागाचे शशांक गोयल,विनायक किलोस्कर, उदय दिवेकर,अजिंक्य पाटील,सतीश पाटील,अशोक विधाते, राजू कोळी आदींनी पुढील स्पर्धेत करता शुभेच्छा दिल्या.