। खरोशी । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप कदम यांची बिनविरोध दुसर्यांदा निवड झाली. तसेच, पुढील तीन वर्षांकरिता नवीन संचालक मंडळाची कमिटी नेमण्यात आली.
कार्याध्यक्षपदी साईनाथ गावंड, उपाध्यक्ष सुधाकर जैवल, उपाध्यक्ष महिला सुप्रिया ठाकूर, सरचिटणीस यशवंत मोकल, खजिनदार धनाजी घरत, प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर ठाकूर, संघटक सुगिंद्र म्हात्रे, सचिन सावंत, देवेंद्र केळुस्कर, दशरथ म्हात्रे, दीपक सूर्यवंशी तर जिल्हा सदस्य मेघा मोरे, कोमल सावंत, पिराजी पालवे, प्रज्ञा कावतकर, स्नेहा गाडे, सुनील गायकर, राजेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार अॅड. विनायक धाटवकर, दिपक घोसाळकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवीन पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
संदीप कदम यांची निवड
