मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांची दक्षिण आशिया पॅसिपीक युनियन विभागातून इंडस्ट्री ऑल या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली आहे. अंतरराष्टीय कामगार संघटनेचे जिनिव्हा येथे जागतिक मुख्यालय आहे. कार्यकारी मंडळाच्या चार वर्षे कालावधीकरिता 60 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने चार हजार प्रतिनिधीमधून दक्षिण आशिया पॅसिपीक विभागातून महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांची तर इंटकचे अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी यांची भारतातून निवड झाली आहे. भारत, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेश या पाच देशांची जबाबदारी सजय वढावकर यांच्यावर राहील. आयटीएफ या आंतरराष्ट्रीय जागतिक वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने उद्योग व्यवसाय व कामगार हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी संजय वढावकर यांच्यावर आहे.