| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील ट्युलिप स्पोर्ट्स अकादमीचा तायक्वांडो पट्टू सौरभ गुरव याने गुजरात राज्यात झालेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. त्यामुळे सौरभ गुरवची आंतररराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सौरभ गुरव हा नेरळ मधील ट्युलिप स्पोर्टस अकॅडमीच्या खेळाडू आहे.
तायक्वांडो पट्टू सौरभ गुरव ने गुजरात राज्यात झालेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदकाची कामे केली. या स्पर्धेत सौरभने मिळविलेल्या यशामुळे त्याची तामिळनाडू येथे होणार्या आंतरराष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूला रायगड जिल्हा तायक्वांडो महासंघाचे अध्यक्ष स्वप्नील अडूरकर यांचे मार्गदर्शन लाभले असून सौरभ हा नेरळ येथील ट्युलिप स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू आहे. सौरभच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने ट्युलिप स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रमुख नम्रता कांदळगावकर आणि नितीन कांदळगावकर यांनी अभिनंदन केले आहे.







