। चौक । वार्ताहर ।
चौक ग्रुप ग्रामपंचायतमधील गेल्या दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सुभाष सि.पवार विजय झाले होते. सध्या विराजमान असलेले उपसरपंच राजन गावडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उपसरपंचपदी एकमताने बिनविरोध निवड होऊन सुभाष पवार यांना खुर्चीत बसविले. गुरुवारी सकाळी कार्यालयीन कामकाज पूर्ण करून दुपारी दोन वाजता त्यांची चौक ग्रामपंचायत कार्यालय येथे विद्यमान सरपंच रितू सुधीर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, राजन गावडे, निखिल मालुसरे, अजिंक्य चौधरी, लक्ष्मीबाई वाघ, नैना झिंगे, पुजा हातमोडे, सुवर्ण राणे, स्वाती देशमुख, अश्विनी म्हात्रे, वृषाली आंबवणे, सिता पवार, राजीव पाटील, कल्पना शिंगवा, ग्रामविकास अधिकारी एस.पी.जाधव तसेच ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






