रायगड क्रिकेट संघात तनिष्काची निवड

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड क्रिकेट असोसिएशनतर्फे निवडण्यात आलेल्या महिलांच्या खुल्या संघात आर.सी.एफ. शाळेच्या तनिष्का वारगे हिची निवड करण्यात आली आहे. ही निवड रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवड यादीद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. संघाचे सर्व शिबिर पुणे येथे सुरू आहेत. यावेळी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, प्रकाश पावसकर व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच, तनिष्का ही सलग दोन वर्ष जगदीश ढगे अकॅडमी अलिबाग येथे ढगे सरांच्या मार्गदशनाखाली लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. रायगडसाठी अलिबागची विद्यार्थीनी खेळणार असल्याने तिचा व तिच्या पालकांचा अभिमान वाटतो. यापुढे इतर मुलामुलींना प्रशिक्षण मिळावे यासाठी आर.सी.एफ. शिक्षण संकुलात मार्गदर्शन शिबीर आयोजित करणार असल्याचे प्राचार्या संविधा जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version