। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड गोवे येथील गीता द.तटकरे तंत्रनिकेतमध्ये केमिकल या शाखेत शिक्षण घेतलेल्या तीन विद्यार्थ्यांची घरडा केमिकल लि.कंपनी खेड रत्नागिरी येथे निवड करण्यात आली आहे. तटकरे तंत्रनिकेतन हे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा बरोबरच विविध ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. घरडा केमिकल कंपनीने गोवे कॉलेज येथे नोकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात इंटरव्ह्यूव केमिकलच्या ऋतिक कदम, समी पानसरे, भूषण साळूखे या तीन विद्यार्थ्यांची प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवड होताच तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, रजिस्टार अजित तेलंगे, प्रा.विपुल मसाल व विभाग प्रमुख बिनीता चौधरी तसेच शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तटकरे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची घरडा कंपनीमध्ये निवड
