व्हॅली स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

। नेरळ । प्रतिनिधी ।

राज्यस्तरीय सिलंबम (लाठी) स्पर्धेत माथेरान व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूंची रायगड जिल्हा संघातून निवड झाली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली होती. या नऊ विद्यार्थ्यांनी तामिळनाडू येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी कायम केली आहे.

पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत स्टिक रोटेशन आणि स्किक फाईट या स्पर्धा 14 आणि 17 वयोगटात खेळविली गेली. स्पर्धेत माथेरान व्हॅली स्कुलच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी शाळेच्या या राज्यस्तरीय स्पर्धेत स्वरा खरात, अंशिका जगताप यांनी सुवर्ण पदक पटकावले. तर, गौरी चव्हाण, मोक्सित दाभेकर, दिशा शेळके, कौशल शेळके, यज्ञा बताले यांनी रौप्यपदक व आरोही महावरकर, यश इंदलकर आणि दिशांत भोईर यांनी कांस्यपदक पटकावले आहे. या 9 विद्यार्थ्यांनी पदकांना गवसणी घालून शाळेचे नाव उंचावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले नाव नक्की केले आहे. ही राष्ट्रीय सिलंबम (लाठी) स्पर्धा तामिळनाडू येथे होणार आहे.

महाराष्ट्र सिलंबम (लाठी) असोसि्एशनचे अध्यक्ष पाष्या अत्तर, मुंबई विभागाचे आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळा साठे आणि दिपाली साठे यांनी राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याचे जाहीर केले. तर, रायगड जिल्हा अध्यक्ष स्वप्निल अडुरकर, सचिव मोहिनी अडुरकर आणि प्रशिक्षक सौरभ गुरव यांचे या विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे भारत एज्युकेशन सोसायटीच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version