| अलिबाग । वार्ताहर ।
22 वी राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा नुकतीच सिंहगड इन्स्टिट्युट सोलापूर येथे दि.28 व 29 नोव्हेंबरला संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये 11 वर्षा खालील गटात हार्दिक संतोष अकोलकर सुवर्णपदक, मल्हार संदेश गुंजाळ कास्य पदक तर 18 वर्षा खालील गटामध्ये शिव देवजी हिलम रौप्य पदक, संस्कार सतीश म्हात्रे कास्य पदक आणि 15 वर्षावरील गटामध्ये शुभम महेंद्र नखाते सुवर्णपदक, वेदांत संदेश सुर्वे सुवर्ण पदक, आशुष प्रविण पडवळ सुवर्ण पदक पटकाविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रियांका संदेश गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. सदरची स्पर्धा 26 ते 29 डिसेंबरला गोवा येथे होणार आहे.