पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्षपदी विनायक पाटील यांची निवड

। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्षपदी आक्षी येथील युवा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या वतीने शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते विनायक पाटील यांना शेतकरी भवन अलिबाग येथे नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version