। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विराज म्हात्रे या विद्यार्थ्याने नुकत्यात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघाला तालवाद्य या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवून देऊन मुंबई विद्यापीठाचे आणि पीएनपी महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी विराजचे अभिनंदन करुन पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे डायरेक्टर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कला शाखाप्रमुख प्रा. नम्रता पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. रवींद्र पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिलिंद घाडगे तसेच सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनीसुद्धा विराजने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विराजने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांमधून पीएनपी महाविद्यालयाचे आणि विराजाचे कौतुक होत आहे.