खांब उपसरपंचपदी वातेरे यांची निवड

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रेय जानू वातेरे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच कांचन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एम. पातेरे यांनी काम पाहिले. यावेळी माजी सरपंच रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, महेंद्र पोटफोडे, मनोज शिर्के, कांचन मोहिते, रंजना टवळे, योगेश धामणसे, मानसी चितळकर, सुरेखा पार्टे, चंद्रकांत जाधव, वसंत मरवडे, जनार्दन महाबळे, विश्वनाथ धामणसे, कृष्णराम धनवी, मनोज सावरकर, काशिनाथ वातेरे, जानू वातेरे, रविंद्र पार्टे, बाळू जाधव, अशोक धामणसे, अजय भोसले, मारूती सावरकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version