। श्रीवर्धन । वार्ताहर ।
सध्याच्या युगात मुलींवर होणारे अत्याचार पाहता त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याकरिता त्यांची तशी मानसिकता बनविणे गरजेचे आहे. संकट कुठून व कधी येईल हे सांगता येत नाही. किशोरवयीन मुलींना प्रवासात बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा अन्य ठिकाणी अत्याचाराला सामोरे जावे लागते. अशावेळी बदनामीच्या भीतीने मुली शांत बसतात व मग पर्यायाने अत्याचार सहन करतात. अशावेळी मुलींना मानसिक दृष्ट्या कणखर बनविणे गरजेचे आहे. हेच लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे हायस्कूल येथे मुलींसाठी स्वसंरक्षणासंदर्भात चॅम्पियन्स कराटे क्लबच्या सौजन्याने नुकतेच एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका जामकर, कनगुटकर सर यांच्या समवेत संपूर्ण शाळा या शिबिरामध्ये सहभागी झाली होती.