महिलांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण

। खांब-रोहे । वार्ताहर ।
कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने व स्वयंरोजगार उपलब्धीसाठी प्रामुख्याने दारिद्र रेषेखालील, निरक्षर ,नवसाक्षर, अकुशल, कामगार आणि अनुसूचित जाती मागासवर्गीय अशा समाजातील सर्व स्तरातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने रोहे तालुक्यातील देवकान्हे येथे महिलांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. श्री मनुष्यबळ विकास मंत्रा. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट रोहा रायगड व जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवकान्हे गावातील महिलांसाठी व धानकान्हे आदिवासी वाडीतील महिलांसाठी या कार्यक्रमातंर्गत दोन महिन्याचा पूर्णवेळ शिवणक्लास सुरु कारण्यात आला. एकूण दोन्ही क्लाससाठी 44 महिलांनी आपली नावे नोंदवली आहेत. या कार्यक्रमाला वसंत भोईर, सुरज कचरे, दयाराम भोईर, ज्ञानेश्‍वर वाघमारे, पुजा गोसावी, निलीमा भोईर, रिया भोईर पार्वती वाघमारे तसेच जन शिक्षण संस्थेकडून कार्यक्रम प्रमुख सुकन्या, प्रशिक्षक शामल आणि एक्सेल कंपनीचे सुशिल रुळेकर, सीएसआर मॅनेजर व व्हिआरटीआयचे प्रमुख रोहा, वि.आर. टी. आय.कडून रिटा कशवालीया उपस्थितीत होते.

Exit mobile version