हिरवळ महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

। माणगाव । प्रतिनिधी ।

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (सीएसएटी) महाडमधील महिला विकास कक्ष आणि आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रीवेन्शन इज बेटर दॅन क्युयर’ या विषयावर मंगळवारी (दि.15) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या सेमिनारसाठी प्रमुख अतिथी म्हणून माया तुकाराम देसाई, सुदेश कदम, राकेश वडवलकर, वर्षा निकम उपस्थित होते. यावेळी माया देसाई यांनी त्यांच्या मार्गदर्शनात महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध सर्व समावेश माहिती विद्यार्थिनींना समजावून सांगितली. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी सांगितले की, महिलांना त्यांच्या आरोग्याची आणि तंदुरुस्तीची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीने त्यांना सुसज्ज करणे महत्वाचे आहे. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सोनाली धारिया यांनी या चर्चासत्रासारख्या शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी हिरवळ महाविद्यालय महाडचे कौतुक केले. त्यांनी या सेमिनारमुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जात असताना होणारा त्रास कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला.

Exit mobile version