तळा येथे परिसंवाद संपन्न

| तळा | वार्ताहर |
तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखांच्या वतीने दि. 3 डिसेंबर रोजी नवीन शैक्षणिक धोरण व त्याचे प्रचलित शिक्षण पद्धतीवरील प्रभाव या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादा च्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मंगेश देशमुख हे होते.

या परिसंवादात प्रा. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे तात्विक अधिष्ठान व मूलभूत वैशिष्ट्याची मांडणी केली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाटे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे प्राथमिक विभागा वरील प्रभावाचे विश्‍लेषण केले. गो.म. वेदक विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक सुहास वावेकर यांनी माध्यमिक विभागावरील नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावाची मांडणी केली. डॉ. नानासाहेब यादव यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षण कसे आमूलाग्र बदलणार आहे याची मांडणी केली. या परिसंवादाचे प्रास्ताविक द.ग. तटकरे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. भगवान लोखंडे यांनी केले. या परिसंवादात चर्चेत सहभागी होताना प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण देशमुख यांनी अमेरिकेतील आपले अनुभव मांडत नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी विद्यार्थी, शिक्षक व संस्था पदाधिकारी यांनी अधिक जबाबदारीने व शिस्तबद्ध पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

यावेळी डॉ. दिवाकर कदम, रोहित भागवत, विनोद महाजन इत्यादी उपस्थितांनी ही यासंदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आभार विद्या प्रबोधिनी या उपक्रमाचे समन्वयक डॉ नवनाथ गायकवाड यांनी केले, तर नियोजन मितेष मुळे व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी उत्तम रीतीने पार पाडले.

Exit mobile version