। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे महापालिकेच्यावतीने ई-वेस्ट या विषयावरती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी पर्यावरण तास हा उपक्रम उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालामध्ये, विद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या माझी वसुंधरा अभियानातील महत्वाच्या घटकांनूसार कृती कार्यक्रम, शिबिरे, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्नमंजूषा, चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी माझी वसुंधराची शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एम जोशी, अक्षय जाधव, अर्चना इंगोले यांचे सहकार्य लाभले.