| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यात राहणारे अभिदास गायकर यांच्या घरासमोर बांधून ठेवलेले दोन बैल अज्ञात व्यक्तींनी चोरी करुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या वर्णनाव्यतिरिक्त इतर कोणताही धागादोरा नसतांना सपोनि. अनुरुध्द गिजे, पोउपनि हर्षल राजपुत व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरु केला. तांत्रिक तपासावरुन तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सलमान उर्फ राजा करीम शेख (25), तारीक यासीन कुरेशी (23), फरहान हनीफ बुबेरे (25) व उवेष उर्फ ओवेस शकील कुरेशी (19) यांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आलेले आहे.