समाजाचे प्रशासनास निवेदन
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जतमध्ये जाऊदा बोहरा समाज सुमारे शंभर वर्षांपासून वास्तव्य करत असून सध्या सुमारे दीडशे कुटुंब वास्तव्यास आहेत. समाजाच्या मागणीनुसार 2001 साली अधिकृतरित्या शासनामार्फत दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, बोहरा समाजाच्या या दफनभूमीत समाजाच्या परवानगीशिवाय बेवारस मृतदेह दफन केले जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. याबाबत त्यांनी कर्जत पोलीस ठाणे व नगरपरिषद यांच्याकडे एप्रिल 2024 रोजी तक्रार दिली होती. त्यावेळी अशा घटना पुन्हा घडणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. तरीसुद्धा वारंवार या घटना घडतच आहेत. त्यासाठी बोहरा समाजाने पुन्हा 17 फेब्रुवारी रोजी कर्जत तहसीलदार, नगर परिषद व पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी जनाब हुसेन अमरावतीवाला, शेख हुनेद भाई, मुल्ला मूर्तझा, अलीअसगर धारीवाला, मुस्तफा धारिवाला, हुसेन जमाली, शब्बीर धारीवाला, युसुफ धारीवाला, मूफद्दल दाभिया, हुझैफा कर्जतवाला, मूर्तझा मोआय्यदी, ताहेर कर्जतवाला, इसाक, मोइझ, हुसेन कर्जतवाला, शब्बीर कर्जत वाला, मन्सूर आलीअसगर बोहरी, अलिअसगर उदयपूरवाला, मुफद्दल टिनवाला आदी यांनी समाजाच्यावतीने संबंधित कार्यालयाला निवेदन दिले.