चालक सुरक्षा यंत्राची राज्यप्रदर्शनात निवड
। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील दुर्गम अश्या चिखलप केंद्रातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील अति दुर्गम भागात असणार्या रायगड जिल्हा परिषदेच्या चिखलप केंद्र शाळेतील इयता 6 वी त श्रावणी विनायक निर्मळ आणि इयत्ता 7 वीत शिक्षण घेणारा अथर्व राजकुमार शिर्के यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मोलाची कामगिरी केली. त्यांनी बनविलेल्या चालक सुरक्षा यंत्राला तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशस्वी भरारी घेतली ही बाब केवळ म्हसळा तालुक्यालाच अभिमानास्पद नसून संपूर्ण जिल्ह्याला अभिमानास्पद ठरली आहे.
चिखलप सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी म्हसळा तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात फार मोठी भरारी मारल्याने म्हसळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा उंचवील्याने चिखलप केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आह.तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेल्या या प्रतिकृती राज्यस्तरावर मोठे यश संपादन व्हावे अशा शुभेच्छा गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी दिल्या. गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख महादेव पवार आणि केंद्रातील शिक्षक विज्ञान विषय पदवीधर हर्षल सूर्यवंशी, विष्णू मिसे, दयानंद बरफ आणि सावन घोडमारे यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन मिळाले. वास्तविक ग्रामिण भागातील विद्यार्थी हे अत्यंत गरीब आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर जाणे परवडत नाही, जिल्हा परिषदेने अश्या जिल्हा आणि राज्यस्तरावर जाणार्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक बजेट मध्ये तरतूद करणे अत्यावश्यक असूनही जिल्हा परिषदेकडून अश्याप्रकारची तरतूद होत नाही. अश्याप्रकारचे जिल्हा आणि राज्यस्तरीय उपक्रमासाठी जिल्हा परिषदेकडून खर्चासाठी तरतूद व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे.