| माणगाव | प्रतिनिधि |
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) महाड मध्ये शनिवारी (दि.10) फेब्रुवारी रोजी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बाबत माहिती देण्याच्या उद्देशाने सेमिनार आयोजित करण्यात आला. या सेमिनारसाठी प्रमुख अतिथी सन्मा.श्री. रोहन साने (असिस्टंट मॅनेजर, एचडीएफसी बँक, पोलादपूर) हे करप्रणाली आणि वित्तीय समस्यांवरील सुप्रसिद्ध तज्ञ उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य. सुदेश कदम यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मा सुदेश कदम यांनी सारख्या महत्त्वाच्या आर्थिक धोरणांबद्दल विद्यार्थ्यांना वास्तविक-जागतिक ज्ञान समजण्यासाठी असे उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात येतात असे सांगतानाच हा एक देश- एक कर या ब्रिदवाक्यावर अवलंबून आहे असे मत मांडले.
सन्मा.श्री.रोहन साने यांनी जीएसटीचे विस्तृत माहिती दिले. त्यांनी सर्वसमावेशक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वापरून जीएसटी चे गुंतागुंतीचे भाग आणि कार्यरत फ्रेमवर्क यासारख्या अनेक बाबी स्पष्ट केल्या. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वेबसाईटच्या माध्यमातून त्यातील असणारे विविध घटक उदाहरणासहित समजावून सांगितली.
तसेच वस्तू व सेवा कर कधी अमलात आणला गेला, जीएसटी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, जीएसटी फायलिंग, टॅक्स रेट्स, जीएसटी चे फायदे व तोटे, त्याची व्याप्ती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर , राज्य वस्तू आणि सेवा कर व एकात्मिक वस्तू आणि सेवा कर असे तीन प्रकार असतात व त्यांचे कायदे व ते कर कसे संकलित केले जातात यावर मार्गदर्शन केले.
हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री. किशोरजी धारिया यांनी जीएसटी सारख्या आधुनिक आर्थिक धोरणांचे महत्व जाणून विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्याची आणि त्यांना वास्तविक जगाच्या अडचणींसाठी सुसज्ज करण्याची महाविद्यालयाची बांधिलकी ठळकपणे मांडली व महाविद्यालयाने स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सोनाली धारिया यांनी जीएसटीचे व्यावहारिक परिणाम स्पष्ट करण्यासाठी शैक्षणिक आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचे विचार मांडले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या मुख्य सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी यांनी जीएसटी बद्दल त्यांचे विचार सामायिक करून आणि विविध उद्योगांमध्ये त्याचा उपयोग आणि परिणामांबद्दल विचार मांडले.
हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे उपप्राचार्य राकेश वडवळकर यांनी सेमिनार आयोजक व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स( कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) मधील विद्यार्थ्यांना जीएसटी सेमिनारच्या माध्यमातून व्यावहारिक माहिती मिळवता आली.