मुलाखत कौशल्यावर चर्चासत्र

। माणगाव । प्रतिनिधी ।

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स महाडमधील व्यवस्थापन विभाग व प्रशिक्षण आणि विकास कक्षामार्फत मुलाखत कौशल्य विकासावर मंगळवारी (दि.13) सकाळी 10 वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रासाठी व्याख्याते म्हणून सतीश नायर, सिद्धार्थ बोस आणि वृषाली निलाखे उपस्थित होते.

प्रास्ताविकात व्यापक मुलाखतीच्या तयारीचा आत्मविश्‍वास, प्रभावी संवाद आणि उद्योग-विशिष्ट ज्ञान प्रस्थापित करण्याचे तंत्र या मूल्यांवर भर देऊन चर्चासत्रासाठी पोषक वातावरण तयार केले. शैक्षणिक आणि व्यवसाय या दोन्हींतील आपल्या कौशल्याचा उपयोग करून सतीश नायर यांनी मुलाखतीच्या तयारीच्या तपासण्यांबाबत विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी यशासाठी लवचिकता आणि सतत शिकण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करून मुलाखत प्रक्रियेतील बदलत्या कलांवर ओघवत्या शैलीत भाष्य केले.

सिद्धार्थ बोस यांनी मुलाखतीच्या तयारीबद्दल त्यांचे विचार मांडताना कटथ्रोट जॉब मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुणांचा जसे प्रॉब्लेम सॉल्विंग टेकनिक, इमोशन इंटेलिजन्स आणि टेकनिक पर्फेक्ट यांच्या सर्वांगीण वाढीचे मूल्य अधोरेखित केले.

वृषाली निलाखे यांनी मॉडर्न, डायनॅमिक वर्कप्लेसच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या मुलाखतीच्या तयारीच्या तंत्रांबद्दल अमूल्य अभ्यासपूर्ण पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुलाखतीवेळी प्रभाव पाडण्यासाठी प्रामाणिकपणा आणि आत्म-जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी सेमिनार आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना समृद्ध आयुष्य जगण्यासाठी चांगली नोकरी मिळणे आवश्यक आहे व ती मिळवण्यासाठी मुलाखत हा पहिला टप्पा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासाठी तयार होणे किती महत्त्वाचे आहे यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या निवडलेल्या उद्योगांमध्ये यशस्वी होण्यासाठी महाविद्यालय असे उपक्रम आयोजित करत असते, असे मत मांडले.

Exit mobile version