। उरण । प्रतिनिधी ।
लोकहितासाठी यशस्वी व प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ मुळेखंड, तेलीपाडा, कोळीवाडा, कुंभारवाडा व परिसर यांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 15) सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
सन 2024-25 या कालावधीत सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महिला-पुरुष मैत्री मेळावे, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान, स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिक वाढदिवस साजरे करणे, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर, तसेच धार्मिक व सांस्कृतिक सहली या उपक्रमातून समाजहिताची अमूल्य सेवा केली आहे. समाजसेवेची प्रेरणा इतरांना मिळावी याची दखल घेऊन उरण तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी तालुका उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी नायब तहसीलदार नरेश पेढवी, निवासी नायब तहसीलदार महेश पाटील, नायब तहसीलदार रवींद्र सानप, नायब तहसीलदार प्रभाकर नवाळे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, सेक्रेटरी परशुराम पाटील, सहसेक्रेटरी सुभाष गुरव, खजिनदार ईश्वर म्हात्रे आदी उपस्थित होते.
तहसीलदारांकडून ज्येष्ठ नागरिक मंडळाचा सन्मान
