| उरण | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक मंडळ मुळेखंड, तेलीपाडा, कुंभारवाडा, कोळीवाडा आणि परिसर यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक वाढदिवस समारंभाचे औचित्य साधून उरण तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांचा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, कार्याध्यक्ष अनंत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. उद्धव कदम यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळास मार्गदर्शन केले. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र, आरोग्य शिबीर घेण्यात येईल, संजय गांधी निराधार योजना याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. जीवनावश्यक वस्तू, औषधे व आर्थिक पाठबळ असेल तर जीवनाचा मार्ग सुकर होतो. माझ्याकडून आपणाला नेहमीच सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन डॉ.उद्धव कदम यांनी केले.
यावेळी अध्यक्ष प्रकाश पाटील, कार्यध्यक्ष अनंत पाटील, चाणजे सरपंच अजय म्हात्रे, ॲड. दत्तात्रेय नवाळे, उपाध्यक्ष अंकुश म्हात्रे, सेक्रेटरी परशुराम पाटील, खजिनदार ईश्वर म्हात्रे, सहसेकेटरी सुभाष गुरव, हरिश्चंद्र म्हात्रे, सर्व सदस्य व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.





