। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
रस्ता ओलांडणाऱ्या शिवाजी जबाजी खंदारे (63) यांना होंडा सिटी मोटर कारने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक अमर सईद सय्यद (रा. रवी बाजारपेठ, लक्ष्मी रोड, पुणे) याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी खंदारे (रा. मालधक्का, पनवेल रेल्वे स्टेशन) हे बुधवारी (दि.18) सायंकाळी सात वाजता जेएनपीटी हायवेवर कंटेनरला रस्ता दाखवण्याचे काम करण्यासाठी गेले होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास ते जेएनपीटी हायवेवर जेएनपीटीकडून पळस्पेकडे जाणाऱ्या लेनवर निलेश धाब्यासमोर रस्ता क्रॉस करत होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या होंडा सिटी कारने त्यांना धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.






