मिनीबस चालक, वाहकाची अरेरावी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांना स्वस्तात प्रवास करता यावा यासाठी राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून एसटी गाडीची मिनीबस चालवली जाते. राज्य सरकारने या मार्गावर चालवण्यासाठी दोन मिनीबस खरेदी केल्या आहेत. मात्र, त्यातील एकच मिनीबस कर्जत-नेरळ माथेरान मार्गावर चालवली जाते. आठवड्यातून एक-दोन वेळा ही मिनीबस नेरळ माथेरान घाटात बंद पडते. त्यामुळे प्रवाशांना घाटात पायपीट करावी लागते. त्यातच रविवारी (दि.18) ही मिनीबस नेरळ येथील थांब्यावर गेलीच नाही आणि माथेरान रस्त्याने हुतात्मा चौकातून थेट माथेरान घाट चढू लागली. त्यामुळे तेथील प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करावा लागला. त्यावेळी त्यांना मिनीबस घाटातून जात असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच टॅक्सीमधून उतरून मिनिबसचे चालक आणि वाहक यांना प्रश्न विचारले. त्याचवेळी प्रवासी ज्येष्ठ नागरिकांना अवमानास्पद वागणूक देखील दिली. त्यामुळे मिनीबसचे चालक आणि वाहक यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल तीव्र शब्दात माथेरान क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष गिरीश पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. शासनाने चालक-वाहकाच्या अरेरावीच्या व्हिडिओची पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version