ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा सत्कार

| अलिबाग | वार्ताहर |
श्री दत्त संस्थान सागरगड – माची तर्फे श्री दत्त याग सोहळा श्री दत्त मंदिर माची येथे आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याच्या सांगता समारंभात येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा सत्कार श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष डॉ. डी. सी. शिवकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास आरसीएफचे निवृत्त मुख्य अभियंता विजय रानडे, पत्रकार अशोक म्हात्रे,बाबाजी महाराज (सिद्धेश्‍वर) उपाध्यक्ष किसन पवार, रेखा शिवकर,निशिगंध शिवकर, पोलीस पाटील,बाळकृष्ण पाटील,संदीप पाटील,चंद्रकांत पाटील,मनोज कोदेरे , रमेश म्हात्रे , परशुराम पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. शिवकर यांनी केले. पत्रकार विजय चवरकर यांनीही वालेकर सर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात वालेकर यांनीही सागरगड – माची ही आदिवासी वाडी वन विभागात वसलेली असल्यामुळे भौतिक सुविधांसाठी शासनाबरोबर 21 वर्षे झगडलो म्हणून रस्त्यासाठी 10 एकर जमीन मिळविण्यात यशस्वी झालो असल्याचे नमूद केले.

Exit mobile version