। सांगोला । प्रतिनिधी ।
शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्यात येणार असल्याने पंढरपूर – सांगोला रस्त्यावर त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.
आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचं पार्थिव सांगोला तालुक्यात दर्शनासाठी येणार असल्याने नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर पंढरपूरवरून येणार्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उभे होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सांगली तालुक्यात आबासाहेबांचं पार्थिव आले असता नागरिकांनी मआबासाहेब अमर रहेफ अशा घोषणाही दिल्या.
खरंतर, गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, काल सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री 9 च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाणारे आमदार म्हणून देशमुख यांची ओळख होती.