। मुंबई। वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिथयश लेखक होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी मोठं काम केलं.
डॉक्टर अनिल अवचट यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. आज (गुरुवार) सकाळी त्यांची प्रकृती बिघडली त्यानंतर ते कोमामध्ये गेले आणि सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.