बीसीसीआय, कोहली वादावरुन ज्येष्ठांनी टोचले कान

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टीम इंडियाचे कर्णधारपदावरुन उचलबांगडी झालेल्या विराट कोहलीने बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली.यावरुन कोहली आणि बीसीसीआय यांच्यात विवाद निर्माण झाला आहे. त्यावरुन ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी विराट कोहलीसह बीसीसीआयचे कान टोचले आहेत.

सौरव गांगुली संभ्रम दूर करणारी व्यक्ती
विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेत झालेल्या खुलाशांवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे सर्व संभ्रम दूर करणारी सर्वोत्तम व्यक्ती आहे, असे सुनिल गावस्कर यांनी म्हटले आहे. मला वाटते की गांगुलीला विचारले पाहिजे की तो काय म्हणाला आणि कोहलीने काय म्हटले आहे, असे गावस्कर यांनी इंडिया टुडेला सांगितले.
कोहलीच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआय संदर्भात काही वाद असल्याचे समोर येत नाही. मला असे वाटते की त्याने कोहलीला असा संदेश दिला होता असा समज कोठून झाला हे विचारावे लागेल. ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये अशी विसंगती का आहे हे नक्कीच विचारले पाहिजे, असे गावस्कर म्हणाले.

आधी देशाचा विचार करा -कपिल
दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या तोंडावर अशी वक्तव्ये बीसीसीआयने आणि कोणत्याही खेळाडूने करु नयेत. पहिल्यांदा देशाचा विचार करावा.असा सल्ला ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी दिला आहे.
विराट कोहलीला एकदिवसी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी परस्पर विरोधी वक्तव्ये केली. त्यामुळे वाद मिटण्याऐवजी तो अधिकच वाढताना दिसत आहे. याच दरम्यान, भारताचे माजी वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ममाध्यमांध्ये येऊन असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे चांगले नाही. पुढे क्रिकेट दौरा आहे. तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

Exit mobile version